माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे निधन
भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. नाडकर्णी यांचे जावई विजय खरे यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. बापू यांचे पूर्ण नाव रमेश गंगाराम नाडकर्णी असे होते. मात्र त्यांना बापू नाडकर्णी या नावाने ओळखलं जातं. बापू यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाडकर्णी बापू नाडकर्णी यांची गोलंदाजांच्या शैलीमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती. नाडकर्णी हे डावखुरी गोलंदाजी करत दिल्या असत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वात कमी धावा करणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी यांची ओळख होती. कसोटीमध्ये क्रिकेटमध्ये सलग २१ षटक मेडन टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावे आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यामध्ये बापू नाडकर्णी यांनी ३२ ओवर टाकल्या होत्या. यामध्ये २१ षटक या मेडन ओवर होत्या. महत्त्वाचं म्हणजे ३२ षटकांमध्ये त्यांनी केवळ पाच धावा दिल्या होत्या.